बॅँको अविज पब्लिकेशन यांच्यामार्फत ‘बॅँको पतसंस्था ब्ल्यु रिबन २०२१’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी संस्थेमार्फत संस्थेची महिती, आर्थिक स्थिती, जोखीम व्यवस्थापन, तंत्रज्ञान, अंतर्गत नियंत्रण प्रणालीसाठी उपाय योजना संस्थेची ग्राहक सेवा व व्यवसाय वृध्दीसाठीची विशेष उपाय योजना व इतर अशा विषयासंदर्भात प्रश्नावली भरून पाठवली होती. त्या माहितीच्या अधारे शिवशक्ती सहकारी पतसंस्थेस नागरी पतसंस्था या विभागामध्ये ‘बॅँको पतसंस्था ब्ल्यु रिबन २०२१’ हा पुरस्कार मिळाला असुन सन्मानचिन्ह स्विकारताना मा. संस्थापक चेअरमन श्री. प्रभाकर साबळे, व्हा. चेअरमन श्री. मधुकर नलवडे, संस्थापक संचालक श्री. हणमंत साबळे व सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच संस्थेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र नांगरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.