• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

  सभासदांना विनंती


  • आपल्या वास्तव्याचे, कामाचे व व्यवसायाचे पत्ता बदलले असतील तर नवीन पत्ता संस्थेचे मुख्य कार्यालय ऑफिस गाळा नं. ७९, जुने आर. टी. ओ. ऑफिस, श्रीजय अपार्टमेंट कदमबाग, सातारा येथे नोंदवावेत जेणेकरून आपणास पत्रव्यवहार करणे, संस्थेस सोईचे होईल.
  • आपल्या वारसाची नोंद संस्थेच्या दप्तरी केली नसेल तर ती त्वरित करुन घ्यावी. वारस नोंदीने आपण, आपल्या पश्चात वारसाच्या हिताचीच व्यवस्था करीत असतो.
  • आपणास मिळत असणा-या लाभाशांची रक्कम आपल्या सेव्हिंग खात्यांवर वर्ग करण्यात येते. आपले संस्थेत खाते नसल्यास नजिकच्या शाखेत ते उघडण्यात यावे.
  • आपणांस मिळणारी लाभांशाची रक्कम खात्यावर वर्ग करण्यासाठी आपल्या सेव्हिंग खात्याचे क्रमांक संस्थेस कळविले नसल्यास ते त्वरित संस्थेस कळवावे. जेणेकरुन लाभाशांची रक्कम खात्यावर वर्ग करणे सोईचे होईल. तीन वर्षापेक्षा अधिक काळ मागणी न केलेली लाभांशाची रक्कम सहकार कायद्यानुसार राखीव निधीमध्ये जमा करण्याता येईल.
  • संस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या योग्य प्रकारे नोंदी ठेवा. विश्वासू व्यक्तीसच जामीन रहा. आपण संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमीत परत फेड करा. नियमीत कर्जफेडीने आपली पत वाढते वा संस्थेच्या विविध स्वरूपाच्या कर्ज योजनांचा लाभ घेता येतो.
  • संस्थेचे कामकाज सहकारी कायदे वा अधिनियम यांना अनुसरून करावे लागते. तेंव्हा आपल्या कामकाजासंबंधी काही अडचण असल्यास समजावून घेवून कर्माचारी वा संचालक मंडळास सहकार्य करावे.
  • माध्यमिक शालांत वा उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत ७५% तसेच विविध पदवी / पदव्युत्तर परिक्षेत प्रथमश्रेणी प्राप्त झालेल्या सभासद पाल्यांचा गुणगौरव वार्षीक सर्वसाधारण सभेच्या वेळी करण्यात येईल. त्याच प्रमाणे आपण छापील अर्ज सभेच्या आगोदर आठ दिवस, पूर्णपणे भरून संबंधीत शाखेत द्यावा.
  • संस्थेच्या आदर्श पोटनियम ड. क्र. 11ब प्रमाणे सभासद शेअर्स हा रु. १०००/- पूर्ण असला पाहिजे तो नसेल तर अपुरी रक्कम आपण त्वरित पूर्ण करावी.
  • आपल्या सुचनांचा आदरपूर्वक स्विकार होईल.