दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत संस्थेच्या मुख्य कार्यालय येथे स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सवा निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वा. ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सहाय्यक उपनिबंधक मा. श्री. शंकर पाटील, शिवशक्ती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. प्रभाकर साबळे, व्हा. चेअरमन श्री. मधुकर नलावडे, शिवशक्ती मल्टीस्टेट चे चेअरमन श्री. राहुल साबळे, व्हा. चेअरमन श्री. शितलकुमार जाधव दोन्ही संस्थांचे सर्व संचालक, सल्लागार समिती सदस्य, जेष्ठ ठेवीदार व सभासद, सर्व सेवक वर्ग यांची संस्थेचे मुख्य कार्यालय कदम बाग येथुन राष्ट्रवादी भवन – छत्रपती शिवाजी सर्कल – नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते परत संस्थेचे मुख्य कार्यालय अशी देशावरील प्रेम व्यक्त करत उत्साहाने स्वातंत्र्यदिनाचा नारा देत प्रभातफेरी काढली होती. यावेळी सहाय्यक उपनिबंधक मा. श्री. शंकर पाटील यांच्या हस्ते छत्रपती श्री. शिवाजी महाराज व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.